कु. निवेदिता पांडुरंग सागर हिने MTS महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये 175 गुण घेऊन जिल्ह्यामध्ये सातवा क्रमांक.
“माध्यमिक विद्यालय, आरदाळ शाळेतील विद्यार्थिनी कु. निवेदिता सागर हिने MTS परीक्षेत 175 गुण मिळवून जिल्हा विशेष प्रमाणपत्र मिळविले आहे. हा यशस्वी निकाल आमच्या शाळेसाठी अभिमानास्पद आहे.”
MTS परीक्षेतील निवेदिता सागरचं यश
:आमच्या माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळेची विद्यार्थीनी कु. निवेदिता पांडुरंग सागर हिने MTS (महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये) 175 गुण घेऊन जिल्ह्यामध्ये सातवा क्रमांक प्राप्त केला तसेच जिल्हास्तरीय स्पेशल प्राईज मिळविले आहे.
आमच्या माध्यमिक विद्यालय आर्दाळ शाळेची सन 2024 25 या शैक्षणिक वर्षातील आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार प्राप्त केलेली विद्यार्थीनी कु.निवेदिता पांडुरंग सागर हिने एस.एस.सी बोर्ड परीक्षेत तब्बल 95.80 गुण प्राप्त करून शाळेमध्ये प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळविला होता. हुशार असणारी ही विद्यार्थी इतर कला गुण प्रकारांमध्ये सुद्धा उत्साहाने सहभागी होत असे. खास करून वक्तृत्व कलेमध्ये तिने आपली वेगळी चुणूक दाखवली होती.
तिच्या मेहनतीची आणि गुणांची वैशिष्ट्ये
शालेय पातळीवरील तसेच तालुका, जिल्हास्तरीय विविध संस्थांनी आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये तिने आत्तापर्यंत प्रथम क्रमांक पटकावण्याचा विक्रम केला आहे. आमच्या शाळेत दहावीत शिकत असताना देखील तिने तब्बल 14 विविध स्पर्धांच्या मध्ये सहभाग नोंदवून प्रत्येक स्पर्धेमध्ये काही स्पर्धा वगळता प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला होता. शाळेतील प्रत्येक कार्यक्रमांमध्ये व खेळ, समूहगीत अशा कोणत्याही स्पर्धेत उस्फूर्तपणे सहभागी होत असे. आताच्या एमटीएस परीक्षेमध्ये 175 गुणासह जिल्ह्यात 7 वा क्रमांक मिळवून व 'जिल्हा विशेष प्रमाणपत्र' शाळेच्या नावलौकिकामध्ये अधिकच भर घातलेली आहे.
शाळेचं अभिनंदन आणि शुभेच्छा
तिच्या यशामध्ये तिची बहीण कु. अमृता पांडुरंग सागर यांचे विषेचं मार्गदर्शन मिळत असते..तसेच तिच्या यशस्वी वाटचालीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक शरद पाटील सर, सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी, आई -वडील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत गेले. कु.निवेदिता सागर हिचे शाळेच्या, संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन..! आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा...!!
● एम.टी.एस परीक्षेत पात्र झालेले आमचे खालील विद्यार्थी..! ●
१) कु.विशाखा संजय घेंगे
२) कु.दयानंद संदीप मोरे
३) कु.आर्या अजित येसादे
४) कु. श्रीजा संतोष चव्हाण
५) कु.रणवीर राजेंद्र देसाई
६) कु.हर्षदा निलेश नरवडकर
७) कु.प्रथमेश विजय पाटील
८) कु. आर्यन मनोहर पावले
९) कु.रसिका बाळू सुतार
१०) कु.अमृता राजेंद्र कांबळे
११) कु. समीक्षा विजय नरवडकर
शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री शरद पाटील सर यांचा अभिप्राय.
💐हार्दिक अभिनंदन💐
माध्यमिक विद्यालय, आरदाळ शाळेतील विद्यार्थिनी कु.निवेदिता सागर हिने MTS परिक्षेत 175गुण मिळवून जिल्हा विशेष प्रमाणपत्र मिळविले आहे त्याबद्दल तिचे शाळेमार्फत मनःपूर्वक अभिनंदन कु.निवेदता हि आमच्या शाळेची आदर्श विद्यार्थीनी असून तिचे वक्तृत्व खूप छान आहे, अवांतर वाचन,सर्व विषयांचा मनापासून अभ्यास करणे, प्रामाणिक प्रयत्न करणे, आत्मविश्वासपूर्वक संभाषण व नीटनेटकेपणा ,आदर अशा अनेक गोष्टी तिच्या मध्ये आहेत तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा💐💐
◆ निवेदिताचे भाषण ऐकण्यासाठी खालील युट्युब लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/tmXK1autjJo?si=6eqdtMHorCx8pjzL


Congratularion 💐💐💐
ReplyDeleteसर.... आपल्या शाळेची ही नैपुण्यता, गुणवत्ता अशा गुणवंत विद्यार्थ्यांनी अधिक उंचावलेली आहे... मनःपूर्वक अभिनंदन...
ReplyDelete