राजर्षी शाहू शिक्षण मंडळ आरदाळ ता- आजरा जि- कोल्हापूर संचलित माध्यमिक विद्यालय आरदाळ ही शाळा १९९१ साली स्थापन करण्यात आली. ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे गेली ३४ वर्षे ही शाळा करत आहे. शाळेचे विद्यार्थी देश विदेशात अनेक उच्च पदावर कार्यरत आहेत. उपक्रमशील शाळा तसेच गुणवत्तेच्या बाबतीत शाळेचा नावलौकिक आहे.