माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळेत नवागतांचे स्वागत.
दि - १६ जून २०२५ - माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळेत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रवेश घेतलेल्या इयत्ता आठवी ते दहावीतील नवागतांचे स्वागत करण्यात आले. स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व पेन देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी नव्याने रुजू झालेल्या सहायक शिक्षिका स्वप्नाली बांबरे यांचेदेखील शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. शाळेतील शिक्षक किरण चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या वाटचालीची आणि उपक्रमाची विद्यार्थ्यांना माहिती करून दिली. स्वप्नाली बांबरे यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक शरद पाटील यांनी शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून या शाळेचे, गावचे तसेच आई-वडिलांचे नाव उज्वल करावे अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक शरद पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिन पावले लाभले होते. तसेच कार्यक्रमाला शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण लोहार यांनी केले, तर आभार सुहास कोंडुसकर यांनी मांडले.
आमच्या शाळेची अधिक माहिती -------
माध्यमिक विद्यालय आर्दाळ
ता -आजरा, जि - कोल्हापूर
शैक्षणिक वर्ष २०२२- २३
शालेय उपक्रम व कार्यक्रम
वार - बुधवार. दि. - १५ जून २०२२
नवागतांचे स्वागत
माध्यमिक विद्यालय आर्दाळ शाळेत इयत्ता ८ वी ९ वी साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.शरद पाटील सरांनी उपस्थित पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे व शिक्षकांच्या हस्ते नवागतांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. नवागतांना आपल्या प्रास्ताविक भाषणातून स्वागत करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेतील शिक्षकांनी आपल्या मनोगतातून नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते श्री.सचिन पावले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आर्दाळ गावचे उपसरपंच श्री.अमोल बांबरे यांनी सुद्धा आपल्या भाषणातून नवागतांचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री.सचिन पावले तर अध्यक्ष म्हणून श्री. अमोल बांबरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.लक्ष्मण लोहार सर यांनी केले तर श्री.सुहास कोंडुसकर यांनी आभार मानले
वार - रविवार दि. - २६ जून २०२२
••••••••●●●●●◆◆◆◆◆◆♦️◆◆◆◆◆◆●●●●●●••••••••
माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळेत शाहू जयंती उत्साहात साजरी.
राजर्षी शाहू शिक्षण मंडळ आरदाळ संचलित माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळेत राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाहू जयंतीचे औचित्य साधून दहावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण समारंभही घेण्यात आला.अव्वल गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी शाहू महाराजांच्याविषयी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शाळेतील शिक्षकांनी शाहू महाराजांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यानंतर प्रमुख पाहुणे श्री.शिवाजीराव पावले, संस्थेचे संचालक श्री दत्तात्रय अस्वले यांनी आपल्या मनोगतात शाहू महाराजांच्याविषयी मुलांना संबोधित केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.शिवाजीराव पन्हाळकर यांनी आपल्या भाषणात शाहू महाराजांच्या विचारांना आदर्श मानून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी असे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष श्री.शिवाजीराव पन्हाळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक श्री. दत्तात्रय अस्वले, आरदाळ गावचे माजी सरपंच श्री.शिवाजीराव पावले, विद्यमान उपसरपंच श्री.अमोल बांबरे, सामाजिक कार्यकर्ते सचिन पावले आदी मान्यवर उपस्थित होते.सुरुवातीला प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.शरद पाटील यांनी मांडले, सूत्रसंचालन श्री.लक्ष्मण लोहार केले तर सौ.दीपाली चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी शाळेचे विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
••••••••●●●●●◆◆◆◆◆◆♦️◆◆◆◆◆◆●●●●●●••••••••
वार - गुरुवार दि - २४ जुलै २०२२
शाळेतील कर्मचाऱ्यांनी खड्डा बुजवण्याचे केले मोलाचे काम.
उतूर आजरा गोवा राज्य महामार्गावरील आरदाळ गावानजीक मुख्य रस्ताच्या मधोमध मृत्यूला आमंत्रण देणारा खड्डा पडला होता. या रस्त्यावरून नेहमी वाहनांची वर्दळ असते, याच मार्गावरून आंबोली गोव्याकडे मोठ्या संख्येने पर्यटक जात असल्याने या रस्त्यावर वाहनांची सतत रहदारी असते. त्यात सध्या जोराचा पाऊस असल्याने व रस्त्यावरून वाहनांचा वेग जास्त असताना हा खड्डा चालकाच्या लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे हा खड्डा वाहनांसाठी व विशेषतः दुचाकी वाहनांसाठी अतिशय धोकादायक बनला होता. या खड्डयामुळे एखादा अपघात होऊन कुणाच्या जीवावर बेतण्याची संभावना अटळ होती. तरीसुद्धा या खड्ड्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले झाले होते संबंधित विभागानेही आजपर्यंत याची दखल घेतली नाही. परंतु हा धोका लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळेचे कर्मचारी श्री.धनाजी ससाणे व श्री. मधुकर चोथे यांनी भर पावसातून या खड्डयात बुरुम टाकून हा खड्डा बुजवण्याचे काम केले. रस्त्यावरील या प्राणघातक खड्डयामुळे कोणताही अपघात घडून कुणाचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांनी केलेले काम खूप मोलाचे आहे.
••••••••●●●●●◆◆◆◆◆◆♦️◆◆◆◆◆◆●●●●●●••••••••
दहावी विद्यार्थी पालक सभा.
माध्यमिक विद्यालय आर्दाळ शाळेत आज पालक सभा आयोजित केली होती. मुख्याध्यापक श्री.शरद पाटील यांच्या हस्ते सर्वांचे स्वागत करण्यात आले. यावेळी दहावी विद्यार्थ्यांचा अभ्यास, प्रगती तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी यावर सखोल चर्चा झाली. घरी दिलेल्या अभ्यासाविषयी विद्यार्थी कसा प्रतिसाद देतात याविषयी पालक व्यक्त झाले. विद्यार्थ्यांच्यात आवश्यक सुधारणा, अभ्यासाविषयक त्यांच्या गरजा, विद्यार्थी प्रतिसाद यांवर शिक्षक पालक यांच्यात सखोल चर्चा झाली. यावेळी विषय शिक्षकांनी आपापल्या विषयातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत संबोधित केले. शासनाकडून सादर झालेल्या नवीन उपक्रमांची माहिती देण्यात आली. श्री.लक्ष्मण लोहार सरांनी पालकांचे आभार मानले.
••••••••●●●●●◆◆◆◆◆◆♦️◆◆◆◆◆◆●●●●●●••••••••
माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळेत लोकशाही मार्गाने पार पडल्या निवडणूका.
माध्यमिक विद्यालय आरदाळ या शाळेत सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील शालेय निवडणुका पार पडल्या. शाळेत दर वर्षी अशा शालेय निवडणुका घेण्याचा उपक्रम घेतला जातो. प्रथम विद्यार्थ्यांच्यातून उमेदवारांची निवड,प्रचार ,मतदान, मतमोजणी आणि शेवटी निकाल अशी सर्व प्रक्रिया या निवडणुकीत राबविण्यात आली. पंचवार्षिक निवडणुकीच्या धर्तीवर तंतोतंत अशी शालेय निवडणूक घेण्यात आली. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्यातून उमेदवारी निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन प्रचार केला.एका वर्गात मतदानाचा कक्ष बनवण्यात आला होता तसेच मतदान बूथही तयार करण्यात आले होते. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांच्या भूमिकेत शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मतदान घेतले. विद्यार्थ्यांनी मतदान केले आहे हे ओळखण्यासाठी बोटाला शाईही लावण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे मतदान केले.
दुसऱ्यादिवशी मतमोजणी करण्यात येऊन निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये शाळा प्रतिनिधी म्हणून कु.अक्षता जाधव इ १० वी , सहलमंत्री कु.स्वरूपा पाटील तसेच वर्गप्रतिनिधी अनुक्रमे कु.अक्षय पावले इयत्ता १० वी. कु. आदित्य शिवणे इयत्ता ९ वी, कु.समर्थ ऱ्हाटवळ इयत्ता ८ वी व सांस्कृतिक,अर्थ,क्रीडामंत्री अशी मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.आनंदी वातावरणात या निवडणुका सुरळीतपणे पार पडल्या.सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे या उपक्रमात सहभाग घेतला.
विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांना लोकशाही मार्गाने कशापद्धतीने निवडणुका होतात.उमेदवार निवडीपासून ते निकालापर्यंत निवडणुक प्रक्रिया कशी पार पडली जाते. याची माहिती व्हावी यासाठी शालेय पातळीवर विद्यार्थ्यांच्या शालेय निवडणुका घेण्याचा उपक्रम शाळेत राबवला जातो. शाळेतील शिक्षक लक्ष्मण लोहार, दीपाली चव्हाण व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी निवडणुकीचे नियोजन केले. या उपक्रमास शाळेचे मुख्याध्यापक शरद पाटील यांची प्रेरणा मिळाली.
••••••••●●●●●◆◆◆◆◆◆♦️◆◆◆◆◆◆●●●●●●••••••••
-
सेवानिवृत्तबद्दल सदिच्छा समारंभ.
माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळेतील कर्मचारी तानाजी बजरंग भोई हे २८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. त्याबद्दल माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळेत सेवानिवृत्त सदिच्छा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रथम राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. मुख्याध्यापकांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सत्कारमूर्ती श्री तानाजी भोई व सौ वंदना भोई यांचा संस्था,शाळा,आरदाळ ग्रामस्थ,प्राथमिक शाळा तसेच कोल्हापूरचे उद्योगपती रामचंद्र भोगम आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक शरद पाटील यांनी प्रास्ताविकात तानाजी भोई यांच्या कार्याचा आढावा मांडला. शाळेचे कर्मचारी धनाजी ससाणे यांनी त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. डी. एम.पाटील,दशरथ अस्वले, शंकर पावले,सोपान कनोजे,दीपक झिटे भोई,दीपाली चव्हाण आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून भोई यांच्या सेवेबद्दल गौरवोद्गार व्यक्त करत सदिच्छा दिल्या. सत्कारमूर्ती तानाजी भोई यांनी मनोगतात शाळेबद्दलच्या आठवणींना उजाळा देताना भावुक उद्गार काढले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव पन्हाळकर यांनी आपल्या भाषणात भोई यांच्या सेवाकाळाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांना सदिच्छा दिल्या. या कार्यक्रमाला सत्कार मूर्ती तानाजी भोई व सौ.वंदना भोई तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवाजीराव पन्हाळकर, प्रमुख पाहुणे रामचंद्र भोगम, प्रमुख उपस्थिती दशरथ अस्वले,शिवाजी पावले,डी.एम पाटील,सोपान कनोजे, दीपक झिटे-भोई,अमोल बामरे,सचिन पावले तानाजी भोई यांचा परिवार,नातेवाईक आरदाळ ग्रामस्थ व पालक,प्राथमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
••••••••●●●●●◆◆◆◆◆◆♦️◆◆◆◆◆◆●●●●●●••••••••
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती
माध्यमिक विद्यालय आर्दाळ शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. .लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून या थोर युगपुरुषांना अभिवादन करण्यात आले. यावेळी लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदान, त्यांचे विचार व कार्य तर आण्णा भाऊ साठे यांचे सयुंक्त महाराष्ट्राच्या उभारणीतील योगदान त्यांचे पोवाडे, साहित्य अशाप्रकारे दोन्हीं थोर पुरुषांविषयी विद्यार्थ्यांना माहीती देण्यात आली.
••••••••●●●●●◆◆◆◆◆◆♦️◆◆◆◆◆◆●●●●●●•••••••
रक्षाबंधन कार्यक्रम.
माध्यमिक विद्यालय आर्दाळ शाळेत रक्षाबंधन सणानिमित्त रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनीनी आणलेल्या राख्या बहिणीच्या मायेने आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या हातांवर बांधून औक्षण केले. यावेळी विद्यार्थ्यांनी भावाची भेट म्हणून आपापल्या परीने विद्यार्थिनींना भेट वस्तू दिल्या. यावेळी शाळेत एक कौटुंबिक वातावरण निर्माण झाले होते. मुला-मुलींच्यातील बहीण भावाचे नाते समृद्ध करणारा हा उपक्रम ठरला. या उपक्रमाचे नियोजन सौ. दिपाली चव्हाण व श्री.लक्ष्मण लोहार आर यांनी केले तर या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री.शरद पाटील सर यांची प्रेरणा मिळाली.
••••••••●●●●●◆◆◆◆◆◆♦️◆◆◆◆◆◆●●●●●●••••••••
१५ ऑगस्ट अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन
सोमवार दि.१५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. शाळेच्या अंगणात व व्हरांड्यात विद्यार्थीनींनी रांगोळी सडा टाकून परिसराची सजावट केली होती. सगळीकडे प्रसन्न व मंगलमय असे देशभक्तीने भारावलेले वातावरण होते.. ध्वजारोहण प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक,मान्यवर,आजी-माजी सैनिक उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री.शरद पाटील सरांनी सर्वांचे स्वागत केले. सकाळी ७:४५ वाजता आरदाळ गावाचे सामाजिक कार्यकर्ते श्री.सचिन पावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.सर्वांनी तिरंग्याला सलामी देऊन राष्ट्रगीत व ध्वजगीताचे गायन केले. यानंतर गावातून प्रत्येक गल्लीतून प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी देशाविषयीच्या व जनजागृतीपर घोषणा देण्यात आल्या. प्राथमिक व माध्यमिक शाळा यांची संयुक्तपणे वाद्यांच्या गजरात गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण करून पुन्हा प्रभातफेरी शाळेकडे मार्गस्थ झाली. स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शाळेत जिलेबी वाटप करण्यात आले. अशाप्रकारे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
••••••••●●●●●◆◆◆◆◆◆♦️◆◆◆◆◆◆●●●●●●••••••••
आरोग्य तपासणी
माध्यमिक विद्यालय आर्दाळ शाळेत आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य उपकेंद्र आर्दाळ यांच्या मार्फत विद्यार्थ्यांचे टी. डी. लसीकरण झाले. यावेळी आरोग्यसेविका सौ. व सौ. विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे आरोग्यविषयक प्रश्न जाणून घेतले. विद्यार्थ्यांच्या सोबत चर्चा केली. प्रत्येक विद्यार्थ्यांची तपासणी करून मग प्रत्येकाला टी. डी. ची लस देण्यात आली.
••••••••●●●●●◆◆◆◆◆◆♦️◆◆◆◆◆◆●●●●●●••••••••
मेहंदी स्पर्धा.
माध्यमिक विद्यालय आर्दाळ शाळेत मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला होता. या उपक्रमात विद्यार्थींनीचा सहभाग मोठा होता. विद्यार्थ्यांनी स्वतः मेहंदीचे कोन आणून एकमेकांच्या हातांवर मेहंदी काढली होते. आपली मेहंदी सुंदर आली पाहिजे या हेतूने अगदी मन लावून प्रत्येक विद्यार्थी हातावर मेहंदी काढत होता. जणू की मेहंदीच्या रंगाप्रमाणे या उपक्रमाला विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे रंगत आली होती. सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय कलाकुसर करत सुबक व सुंदर मेहंदी हातांवर रेखाटली होती. या स्पर्धेत अनुक्रमे कु. हर्षदा प्रल्हाद सागर इ १० वी , कु. ऋतुजा संतोष पाटील इ.९ वी, कु. तनुजा युवराज पाटील इ.१० या विद्यार्थीनींनी नंबर पटकावला. या उपक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले तर मुख्याध्यापक श्री.शरद पाटील सर यांची प्रेरणा मिळाली.
••••••••●●●●●◆◆◆◆◆◆♦️◆◆◆◆◆◆●●●●●●••••••••
विशेष लेख :
माध्यमिक विद्यालय आर्दाळ शाळेचा उपक्रम : झिम्मा फुगडी खेळातून पारंपरिक संस्कृतीचं केलं जातं आहे जतन.
आज आपली अशी तक्रार असते की,आपले पारंपरिक खेळ,सण -उत्सव,संस्कृती मागे पडत चालली आहे, कुठे तरी हरवत चालली आहे.पहिल्यासारखा आनंद नाही की उत्साह नाही. आणि खरंही आहे एकेकाळच्या निर्मळ आणि सात्विक आनंदाची जागा आता कानठळ्या बसणाऱ्या डॉल्बीने घेतली आहे. उथळ आणि निरर्थक अवाजवी गाण्यांवर थिरकणारी तरुणाई. गोंधळ आणि गोंगाट असेच आजच्या सणांचे समीकरण झाले आहे. भडकपणा आणि भपकेपणा यात आपली मूळ संस्कृती बाजूला पडते आहे असे वाटणे साहजिक आहे.
परंतु आपल्या संस्कृतीची नाळ नव्या पिढीशी जोडत त्यामधील मौलिक आनंदांचा सार नव्या पिढीला कळण्यासाठी आणि आपल्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी आजही आमच्या अनेक शाळा असे प्रयत्न करत आहेत. त्याचेच एक प्रतिनिधीक उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील माध्यमिक विद्यालय आर्दाळ शाळेने असाच झिम्मा फुगडीचा पारंपारिक खेळ आयोजित केला होता. किंबहुना दरवर्षी असा खेळ आयोजित केला जातो. गावच्या भैरीदेव मंदिरात अतिशय उत्साही,प्रसन्न आणि चैतन्यमयी वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. भला मोठा पिंपळ वृक्ष, सुबक व देखणे मंदिर ,मंदिराचा प्रसन्न परिसर अशा सुंदर वातावरणात मी प्रथमच शाळेतील असा झिम्मा फुगडीचा क्षण अनुभवला. आणि तो म्हणजे माझ्याच शाळेतील विद्यार्थिनींच्या माध्यमातून. नऊवारी साडी नेसून, सजून-धजून, नटून- थटून आलेल्या आमच्या विद्यार्थीनी म्हणजे जणू साक्षात गौराईचं तेजस्वी ओजस्वी प्रसन्न रुपडंचं भासत होत्या. भैरीदेवाच्या साक्षीने मंदिराच्या सभा मंडपात गणपती गौरी गीतांचा उत्सव सुरू झाला. गोलकार रिंगण करून तालासुरात साऱ्या मुलींनी फेर धरला. गावातील महिला भगिनींही सहभागी झाल्या होत्या. लेकींच्या आनंदात आईही सामील होती.मायलेकीचं एकरूप नातं या कार्यक्रमात तर अधिकच एकरूप झालं होतं. किती मंगल देखणं आणि पावन असं ते दृश्य डोळ्यांत मनांत कितीसं साठवावं असं झालं होतं.सगळीकडे किती आनंदी आनंद दाटला होता. हिरव्यागार रानातला नितळ पाण्याचा धबधबा ओसंडून वहावा तसा प्रत्येकीच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता. "आनंदाचे डोही आनंद तरंग" तसं खरंच तो आनंदांचा डोहचं जणू. एका निर्मळ आनंदाची निर्मिती प्रकट होऊन सारा भोवताल आनंदीमयी होत होता.त्याचे तरंग मनामनातपर्यंत पोहोचून प्रत्येक जीवाला सुखावत होता.
बगलेला बसलेल्या माता भगिनी पारंपरिक गौरीं गीत गात होत्या. त्यांच्या सुरांच्या लयीवर इकडे आमच्या विद्यार्थींनी अधिकच दंग झाल्या होत्या.भान हरपून जाणं म्हणतात ना ? ती अवस्था त्यांना प्राप्त झाली होती. मुलीं देखील स्वतः गीतं गात होत्या. 'चंद्रभागेच्या कोन्याला कोन्याला दिवस उगविला,मी बसते चांदला चांदला पदर माझ्या खांद्याला.' या गीतातून तर चंद्रभागेच्या कोन्याला स्पर्श करणारा सूक्ष्म भाव प्रकट होत होता.आपला पदर उंचावत हे गीत तर मुलींनी इतक्या आवेशाने सादर केलं की संस्कृतीचे अनेकविध पदर किती सहज सुंदरपणे उलगडत होते.' खुंटा नी मिरची जाशील कैशी'... यातून बाहेर जाऊ पाहणारी आणि तिला अडवणाऱ्या तिच्या मैत्रिणी.. हे दृश्यही किती लोभसवाणे वाटत होतं.
झिम पोरी झिम या गीतावर घातलेला झिम्मा तर किस बाई किस दोडका किस..अशी गीतं भूतकाळातल्या सगळ्या आठवणी ताज्या करून गेल्या. बेभान होऊन गरागरा फिरणारी फुगडी असेल पिंगा,घोडा किंवा
घागर घुमू दे घुमू दे या गीतावर घागर नाचवण.. आणि त्यांच्या भोवतीने एकीने हातात सूप घेऊन नाचवण या खेळांतून सगळ्यांचीच मनं आकर्षून घेतली. या आनंदाला इतकं उधाण आलं होतं की, आमच्या विद्यार्थ्यांनाही राहवलं नाही.त्यांनी सुद्धा फुगडी घालून आपला आनंद प्रकट केला. अशाप्रकारे विद्यार्थींनीच्या झिम्मा फुगडीच्या खेळाच्या आनंदात अक्षरशः आम्हीं सारे न्हाऊन निघालो.
झिम्मा फुगडीच्या खेळाने आपल्या जुन्या पारंपरिक माता भगिनींच्या हक्काच्या खेळाला उजाळा दिला. एक जुना काळ जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिला. गौरींगणपतीला माहेरवाशीणी माहेराला यायच्या, मैत्रिणीचा मेळा जमायचा गावच्या राऊळात,किंवा एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली आणि रात्री गल्लोगल्ली असा झिम्मा फुगडीचा खेळ रंगत असायचा...संसारातील सुख दुःखाचा विसर पडायचा बालपणातला खेळकर,खोडकर, निरागस निखळ आनंदांचा मूळ स्वभाव जागृत व्हायचा.. साऱ्या माहेरवाशीणी लेकी ताज्या तवाण्या व्हायच्या आणि एक नवी ऊर्जा घेऊन सासरी परतायच्या.
नऊवारी साडी,नाकात चमकणारी जडशीर नथ, सोनसळी अलंकारांनी भरलेला गळा असा साज लेवून आलेल्या आमच्या एकेक गौराईमधून भारतीय संस्कृतीचं दर्शन होत होतं. आणि त्यांनी खेळलेल्या झिम्मा फुगडीच्या खेळातून आपल्या पारंपरिक संस्कृतीच प्रकटीकरण होतं होत. यावरून मी जे अनुभवलं की, ते जुने दिवस कुठेही हरवलेले नाहीत, ना कुठे आपली संस्कृती हरवत चाललेली आहे. ती सात्विकता, ती एकरूपता,निर्मळ निखळ आनंद नव्याने आणू शकतो. जे होतं तसंच आहे. मी पाहत होतो ते पिंपळाचं झाड,मंदिर,नऊवारी साडीतल्या आमच्या मायलेकी,गौरी गणपतीची गाणी अगदी जसंच्या तसं आहे. फक्त गरज आहे ती आपली ही जुनी संस्कृती जतन करून तिला नवसंजीवनी देण्याची आणि हे काम आजच्या शाळेतून होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. आपल्या संस्कृतीचे संस्कार देणाऱ्या अशा शाळा,प्रेरणा देणारे मुख्याध्यापक,यासाठी धडपडणारे शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी आणि अशा उपक्रमाला पाठींबा देणारे गावकरी यांचं समाजाकडून कौतुक झालं पाहिजे. कारण अशा सर्वांच्या माध्यमातून
येणाऱ्या नवीन पिढीत संस्कृतीच्या संस्काराचे बीजारोपण झाले तर नक्कीच आपली संस्कृती येणाऱ्या नव्या काळातही नव्याने बहरेल फुलेल आणि एका निर्मळ, निखळ आणि नितळ आनंदाची अनुभूती आपणा सर्वांना घेता येईल
••••••••●●●●●◆◆◆◆◆◆♦️◆◆◆◆◆◆●●●●●●••••••••
शिक्षक दिन
५ सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती निमित्त शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या दैनंदिन अध्यापनाच्या कामकाजाची जबाबदारी दिवसभर आपल्याकडे घेतली. मुख्याध्यापकासह, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अशी आपल्यात पदे वाटून घेऊन अध्यापनाचे नियोजन केले गेले. प्रथमतः सरस्वती पूजन व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनी शिक्षकदिनाला सुरुवात केली. दिवसभर अत्यंत चांगल्यापद्धतीने जबाबदारीने प्रत्येक वर्गात अध्यापन केले. त्यानंतर चार वाजता कार्यक्रम घेऊन डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांनी दिवसभर आलेल्या अनुभव व्यक्त केले. या उपक्रमास मुख्याध्यापक,सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन तर शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
••••••••●●●●●◆◆◆◆◆◆♦️◆◆◆◆◆◆●●●●●●••••••••
वार - दि. -
सापांचे प्रात्यक्षिक
माध्यमिक विद्यालय आर्दाळ शाळेत सर्पमित्र विजय पाकले सरांनी विद्यार्थ्यांना हरणटोळ या सापाविषयी माहिती दिली. यावेळी पाकले सरांनी विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी हरणटोळ हा साप प्रत्यक्ष वर्गात आणला होता. विद्यार्थ्यांनी हा साप प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव घेतला. पाकले सरांनी या सापाची वैशिष्ट्य, अधिवास या संदर्भात माहिती दिली. या अगोदरही सरांनी नाग,मण्यार असे साप वर्गात आणून दाखवले होते. सापाविषयी समाजात असणारे गैरसमज, भीती दूर करून सापांना जीवदान देण्याचे काम पाकले सर करतात आजपर्यंत त्यांनी असंख्य सापांना जीवदान दिले आहे. वेळोवेळी ते शाळेला भेट देऊन सापांविषयी माहिती विद्यार्थ्यांना देत असतात.
वार - दि. -
१४ सप्टेंबर हिंदी दिन.
१४ सप्टेंबर के दिन प्रशाला में राष्ट्रीय हिंदी दिन बहोत उत्साह से मनाया गया | इस दौरान प्रशाला में कार्यक्रम आयोजित किया गया था | प्रथम प्रशाला के हिंदी अध्यापक श्री.लक्ष्मण लोहार सरजी को प्रशाला के ओर सें प्रधान अध्यापक श्री.शरद पाटील सर, सभी अध्यापक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी इनकी ओर से शुभकामनाएं दिए | हिंदी भाषा के बारे मे प्रशाला के अध्यापकोने जानकारी दी | विद्यार्थियों ने भी हिंदी भाषा के बारे में अपनी राय सामने रखी | हिंदी भाषा के मुख्य अध्यापक श्री.लक्ष्मण लोहार सरजी ने हिंदी भाषा का इतिहास, संस्कृति एवं अपने जीवन में हिंदी भाषा का मूल्य और महत्व इसके बारे में महत्वपूर्ण जानकारी बताई | इस कार्यक्रम में हिंदी दिन के अवसर पर सभी ने पूरा दिन हिंदी में संवाद किया | इस तरह बड़े सम्मान से प्रशाल में हिंदी दिन मनाया गया |
••••••••●●●●●◆◆◆◆◆◆♦️◆◆◆◆◆◆●●●●●●••••••••
स्वच्छता हीच सेवा - शपथ
आज संपूर्ण भारतात स्वच्छ भारत सुंदर भारत हे अभियान राबविण्यात येत आहे. त्या धर्तीवर शासनाच्या परिपत्रकानुसार शाळेत विद्यार्थ्यांच्याकडून स्वच्छता हीच सेवा ही शपथ घेण्यात आली. स्वच्छता या विषयाच्या जनजागृतीपर विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये लिहून आणली होती. स्वच्छता मोहीमेत प्रत्येकांनी स्वयंप्रेरणेने सहभागी होऊन आपले घर,शाळा,परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. स्वच्छता ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना यावेळी स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. व त्यानंतर स्वच्छता हीच सेवा अंतर्गत विद्यार्थ्यांकडून शपथ घेण्यात आली.
•••••••●●●●●◆◆◆◆◆◆♦️◆◆◆◆◆◆●●●●●●••••••••
स्वच्छता मोहीम.
माध्यमिक विद्यालय आर्दाळ शाळेच्यावतीने आर्दाळ गावात भैरीदेव मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली विद्यार्थ्यांनी आदल्या दिवशी विद्यार्थ्यांना स्वच्छता विषयक साहित्य कुदळ पावडे खराटा बुट्टी खुरपे असे साहित्य आणावयास सांगितले होते दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे आणि आत्मीयतेने भैरीदेव मंदिराच्या परिसरातील स्वच्छता केली. वाढलेली झुडपे गवत कचरा प्लास्टिक वस्तू विद्यार्थ्यांनी गोळा करून व वाढलेले गवत, तण खुरप्याने कापून, झाडांचा पालापाचोळा वेचून त्याची योग्य विल्हेवाट लावली. व संपूर्ण परिसर काही वेळात विद्यार्थ्यांनी सुंदर व निर्मळ केला. यावेळी ग्रामस्थांनी ही मदत केली. या उपक्रमास शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन मिळाले तर शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
•••••••●●●●●◆◆◆◆◆◆♦️◆◆◆◆◆◆●●●●●●••••••••
आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन
माध्यमिक विद्यालय अर्दाळ शाळेत आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन विषयी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बी आर सी आजरा विभागाचे श्री माने श्री सुतार एस आर व श्रीमाने येण्यास ही उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री शरद पाटील सर यांनी गुलाब पुष्प देऊन पाहुण्यांचे स्वागत केले . यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या साठी राबवण्यात येणाऱ्या योजना शिष्यवृत्ती यांच्या संदर्भात सखोल माहिती दिली त्याचबरोबर शासन स्तरावर वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती यावेळी देण्यात आले अध्यक्ष भाषणामध्ये शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रमुख पाहुण्यांच्या माहितीचा आधार देत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन दिले श्री लक्ष्मण लोहार यांनी पाहुण्यांचे आभार मानले.
•••••••●●●●●◆◆◆◆◆◆♦️◆◆◆◆◆◆●●●●●●••••••••
शिक्षक-पालक मेळावा उत्साहात संपन्न.
माध्यमिक विद्यालय आर्दाळ शाळेत शिक्षक-पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. सरस्वती प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.शाळेचे मुख्याध्यापक यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्राथमिक शिक्षक डॉ.मारुती डेळेकर यांचा कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्याचसोबत एन.एम.एम.एस व सारथी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक शरद पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले. शाळेचे माजी मुख्याध्यापक शंकर पावले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे डॉ.मारुती डेळेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक व पालकांची भूमिका कशी असायला हवी याबद्दल आपले विचार व्यक्त केले. यानंतर शिक्षक व पालक यांच्यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती,अभ्यास, स्वयंअध्ययन याबाबत चर्चा झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक दशरथ अस्वले यांनी शिक्षक-पालक मेळाव्यास मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण लोहार यांनी केले तर सुहास कोंडुसकर यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
•••••••●●●●●◆◆◆◆◆◆♦️◆◆◆◆◆◆●●●●●●••••••••
वक्तृत्व स्पर्धेत शाळेचे यश
आजरा महाविद्यालय आजरा यांच्या वतीने अण्णाभाऊ स्मृती पंधरवडा 2022 निमित्त घेण्यात आलेल्या शालेय वक्तृत्व व निबंध स्पर्धेत शाळेच्या वतीने तीन विद्यार्थी सहभागी झाले होते यापैकी कुमारी अमृता राजेंद्र कांबळे हिने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव काय गमावले व काय कमावले या विषयात द्वितीय क्रमांक पटकावला तर कुमारी स्वरूपा स्वरूपा सर्जेराव नेताजी पाटील शिने सोशल मीडिया आणि आजचा विद्यार्थी तर आणि कोण सृष्टी सुरेश शेळके यांनी आजऱ्याची सौंदर्य हा विषय घेऊन निबंध स्पर्धेत सहभाग घेतला होता यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांची मार्गदर्शन लाभले तर शाळेची मुख्याध्यापक श्री शरद पाटील सर यांची प्रेरणा मिळाली.
•••••••●●●●●◆◆◆◆◆◆♦️◆◆◆◆◆◆●●●●●●••••••••
दांडिया व गरबा नृत्य
दसरा सणानिमित्त माध्यमिक विद्यालय अर्ध शाळेतील विद्यार्थ्यांचा दांडिया व गरबा नृत्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात बहिरेदेव मंदिराच्या सभा मंडपात पार पडला यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. दांडिया व गरबा संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी अतिशय लयबद्ध व तालामध्ये दांडिया व गरबा नृत्य सादर केले अतिशय देखणा आणि प्रसन्न असा सोहळा अनुभवायला मिळाला. प्रत्येक विद्यार्थी अतिशय आनंदाने व उत्स्फूर्तपणे या सोहळ्यामध्ये सहभागी झालेला होता. परिसरातील महिला हा कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थित होत्या. या उपक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन मिळाले तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले तसेच या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री शरद पाटील सर यांची प्रेरणा मिळाली.
•••••••●●●●●◆◆◆◆◆◆♦️◆◆◆◆◆◆●●●●●●••••••••
आर्थिक क्षेत्रातील करिअर संधी मार्गदर्शन शिबिर.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यावतीने आर्थिक क्षेत्रातील करिअर संधी या विषयावर प्रमुख मार्गदर्शक श्री. अरविंद शिंगाडे यांचे ऑनलाइन मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून या शिबिराचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला. यामध्ये आर्थिक क्षेत्रातील, स्टोक ब्रोकर,वीत्त व अर्थ, वाणिज्य शाखा, बँकिंग क्षेत्र, उद्योजकता या माध्यमातून निर्माण होणाऱ्या आर्थिक क्षेत्रातील करिअरच्या संधी तसेच आवश्यक अभ्यासक्रम, विविध पदांची माहिती या विषयाची सखोल व सुलभ माहिती विद्यार्थ्यांना या शिबिरातून मिळाली.
•••••••●●●●●◆◆◆◆◆◆♦️◆◆◆◆◆◆●●●●●●••••••••
Let's Chang film
'स्वच्छता' या विषयावर चित्रित केलेला लेट्स चेंज (चला बदलूया) हा चित्रपट विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मध्ये स्वच्छतेचे मूल्य रुजावे, स्वच्छतेचे महत्त्व कळावे त्यासोबत स्वच्छता या विषयाच्या बाबतीत स्वयंप्रेरणेने त्यांनी काम करावे यासाठी या उद्देशाने हा चित्रपट निर्माण केला आहे. स्वच्छता या मोहिमेच्या बाबतीत सर्वांना प्रेरणा देणारा हा चित्रपट आहे मुलांच्या बालविश्वात जाऊन अतिशय मनोरंजक व सोप्या पद्धतीने हा चित्रपट बनवला आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचे आकलन होते. अतिशय शांततापूर्वक विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहिला व त्याचा आनंदही घेतला. या चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी प्रेरणा मिळाली.
•••••••●●●●●◆◆◆◆◆◆♦️◆◆◆◆◆◆●●●●●●••••••••
भारतरत्न डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी.
माध्यमिक विद्यालय आर्दाळ शाळेत भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री शरद पाटील यांच्या हस्ते कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. विशेषतः शाळेचा विद्यार्थी कु.वैभव रायकर याने अब्दुल कलाम यांच्यासारखी वेशभूषा केली होती. त्यांच्या कष्टाचे प्रतीक म्हणून विद्यार्थ्यांकडून शाळेत वर्तमानपत्रांचे वाटप करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री.शरद पाटील यांनी विद्यार्थ्यांना डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्याविषयी माहिती सांगितली. त्यासोबत कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. आर्दाळ तरुण भारत वाचनालयातर्फे शाळेत विविध पुस्तकांची मांडणी केली होती. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी पुस्तक व वर्तमानपत्र वाचण्याचा आनंद घेतला. आज वृत्तपत्र दिन व हात धुवा दिन असल्याने संयुक्तिक कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील सर्व शिक्षकांनी केले,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले तर या कार्यक्रमास मुख्याध्यापक शरद पाटील यांची प्रेरणा मिळाली.
•••••••●●●●●◆◆◆◆◆◆♦️◆◆◆◆◆◆●●●●●●••••••••

































No comments:
Post a Comment