📝 विद्यार्थी सुरक्षा समिती गठन
प्रस्तावना :
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळेत "विद्यार्थी सुरक्षा समिती" स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक परिसर सुरक्षित, स्वच्छ व अनुशासित ठेवणे, अपघात टाळणे तसेच आपत्ती व्यवस्थापनासंबंधी तयारी ठेवणे.
समितीची रचना :
विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकासन समिती
शैक्षणिक सत्र २०२५–२६
शासन निर्णय क्र. संकीर्ण 1125/प्र.क्र.251/25एसएसएम-1 दि. 16 एप्रिल 2025 अन्वये
अ.क्र. प्रतिनिधी शुभनाम पद
1 संस्थेची व्यक्ती श्री. शिवाजीराव पन्हाळकर अध्यक्ष
2 मुख्याध्यापक श्री. शरद बाबुराव पाटील सचिव
3 ग्रा. पं. सदस्य श्री. विठ्ठल शंकर पवार सदस्य
4 शिक्षक प्रतिनिधी श्री. लक्ष्मण गणपती लोहार। सदस्य
5 शिक्षणतज्ञ श्री. शंकर अंतु पावले सदस्य
6 आरोग्यसेविका सौ. आनंदी कृष्णा शिवणे सदस्य
7 अंगणवाडी सेविका सौ. अरुणा सूर्योदय साबळे सदस्य
8 ग्रामसेवक श्री. बाळासाहेब पाथरवट सदस्य
9 पोलिस पाटील सौ. मनीषा दत्तात्रय गुरव सदस्य
10 डॉक्टर। सौ. सोबिकड रीना सदस्य
11 वकील / पत्रकार —————————— सदस्य
12 माजी विद्यार्थीनी सौ. स्वप्निल अमोल बांबरे सदस्य
13 पालक श्री. विजय भाऊ पाटील सदस्य
14 व्यावसायिक —————————— सदस्य
15 केंद्रप्रमुख श्री. रावसाहेब देसाई सदस्य
16 वाहनसेवेशी व्यक्ती श्री धनाजी मारुती ससाणे सदस्य
17 बस कंत्राटदार —————————— सदस्य
18 विद्यार्थी प्रतिनिधी कु. हर्षदा निलेश नरवडकर सदस्य
समितीची कार्ये :
1. शाळा परिसर, खेळाचे मैदान व वर्गखोल्यांमध्ये सुरक्षा उपाय तपासणे.
2. शाळेतील इमारत, जिने, खिडक्या, दरवाजे, इलेक्ट्रिक वायरिंग यांची नियमित पाहणी करणे.
3. विद्यार्थ्यांना अग्निशमन, प्राथमिक उपचार व आपत्कालीन परिस्थितीतील नियमांची माहिती देणे.
4. शाळेत येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवणे व रस्ता सुरक्षा जनजागृती करणे.
5. सीसीटीव्ही, फायर एक्स्टिंग्विशर यांची कार्यक्षमता तपासणे.
6. शाळेत येणाऱ्या पाहुण्यांची व बाहेरील व्यक्तींची नोंद ठेवणे.
7. आरोग्य व स्वच्छतेसंदर्भात मार्गदर्शन करणे.
समितीची केलेली कामे (उदाहरण) :
१५ ऑगस्ट २०२५ रोजी शाळेत अग्निशमन सराव कार्यक्रम पार पाडला.
विद्यार्थ्यांना "रस्ता सुरक्षा जनजागृती आठवड्यात" हेल्मेट वापर, झेब्रा क्रॉसिंग वापर या बाबत मार्गदर्शन केले.
शाळेतील सर्व वर्गखोल्यांमध्ये फर्स्ट एड बॉक्स उपलब्ध करून दिले.
मैदान व इमारतीची सुरक्षा तपासणी करून अहवाल मुख्याध्यापकांना सादर केला.
निरीक्षणे :
शाळेतील काही ठिकाणी तुटलेले बाके व दगडी फरशी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करतात.
खेळाच्या मैदानाभोवती कुंपणाची गरज आहे.
काही फायर एक्स्टिंग्विशरची मुदत संपलेली आढळली.
सूचना / शिफारसी :
1. शाळेतील सर्व फर्निचर व इमारतीची दुरुस्ती करावी.
2. नियमितपणे अग्निशमन सराव आयोजित करावा.
3. विद्यार्थ्यांना सुरक्षा नियमांची सतत माहिती देणे आवश्यक आहे.
4. वाहतूक पोलीस विभागाच्या सहकार्याने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम राबवावा.
5. आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र हेल्पलाईन तयार करावी.
निष्कर्ष :
विद्यार्थी सुरक्षा समितीने शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत. पुढील काळात शाळेच्या प्रशासनासोबत मिळून सर्व उपाय अधिक प्रभावीपणे राबविण्यात येतील.

No comments:
Post a Comment