🌟 साहित्य क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व श्रीकांत नाईक सरांचे शाळेला भेट 🌟
आमच्या शाळेत साहित्य क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, हाडाचे शिक्षक श्री श्रीकांत नाईक सर यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री. शरद पाटील सरांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन मनोभावे सत्कार केला.
यानंतर नाईक सरांनी विद्यार्थ्यांना "मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे" या माधव कोंडविलकर लिखित पुस्तकाची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना हे पुस्तक वाचण्याचे आणि त्यावर अभिप्राय लिहून काढण्याचे आवाहन केले. अशा दर्जेदार पुस्तकांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारल्या आणि एकत्र फोटो सेशनही केले. त्यांच्या भेटीने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आणि सृजनशीलतेची प्रेरणा जागृत झाली.
📸 कार्यक्रमातील काही झलक:
|
|
|
📚 विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासावी, हेच या भेटीचे सार्थ उद्दिष्ट! ✨
No comments:
Post a Comment