भारताचे पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त
शालेय निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा
दिनांक: 17 सप्टेंबर 2025
स्थळ: माध्यमिक विद्यालय, आरदाळ
भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी माध्यमिक विद्यालय, आरदाळ येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी जी यांना त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षण विभागाकडून घेण्यात येणाऱ्या शाळा स्तरावरील उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा यांची माहिती विद्यार्थ्यांना देऊन या स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना समाजाभिमुख व राष्ट्रीय जाणीवा वृद्धिंगत करणारे विषय देण्यात आले. “आत्मनिर्भर भारत”, “स्वदेशी”, “ऑपरेशन सिंदूर” आणि “पर्यावरण” या विषयांवर विद्यार्थ्यांनी आशयपूर्ण निबंध लिहिले, कल्पक चित्रे काढली तसेच प्रभावी भाषणे सादर केली. वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भरतेचे महत्त्व, स्वदेशी तत्त्वज्ञान, सैनिकांचे शौर्य आणि पर्यावरण संवर्धन यावर प्रभावी विचार मांडले. निबंध स्पर्धेत त्यांचे लेखन कौशल्य खुलून दिसले, तर चित्रकलेतून त्यांनी राष्ट्रप्रेम व सर्जनशीलतेचे दर्शन घडविले.
विशेष म्हणजे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या सर्व स्पर्धेत उत्स्फूर्त आणि आनंदाने सहभाग घेतला. प्रत्येकजण आपला निबंध सर्वोत्कृष्ट लिहिण्याचा प्रयत्न करीत होता… तर चित्रं काढण्यात सर्व मुले मग्न झालेली होती. वक्तृत्व स्पर्धेत तर विद्यार्थ्यांचा चांगला उत्साह दिसून येत होता.
या उपक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून शाळेचे शिक्षक श्री लक्ष्मण लोहार सर, श्री रणजीत सुतार सर, श्री किरण चव्हाण सर यांनी मार्गदर्शन केले तर चित्रकला या विषयासाठी श्री विजय पाकले सर यांनी विशेष मार्गदर्शन केले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे मनःपूर्वक कौतुक केले आणि समाजासाठी जबाबदार नागरिक बनण्याचे मौलिक मार्गदर्शन केले.
या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री शरद पाटील सर यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर वर्गाने नियोजनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि शिक्षकांचे सहकार्य यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना, आत्मविश्वास, सामाजिक जबाबदारी आणि सर्जनशीलता वृद्धिंगत झाली.
निबंध स्पर्धा
चित्रकला स्पर्धा





No comments:
Post a Comment