Tuesday, November 11, 2025

“चला संशोधनाकडे वळूया : आरदाळ विद्यालयातील प्रेरणादायी विज्ञान उपक्रम | मराठी विज्ञान परिषद गडहिंग्लज”

🚀 चला संशोधनाकडे वळूया — प्रेरणादायी उपक्रम आरदाळ माध्यमिक विद्यालयात

मराठी विज्ञान परिषद, गडहिंग्लज यांच्या माध्यमातून माध्यमिक विद्यालय, आरदाळ येथे ‘चला संशोधनाकडे वळूया’ हा विज्ञानविषयक उपक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली. त्यानंतर पाहुण्यांची ओळख करून देण्यात आली.

शाळेचे मुख्याध्यापक शरद पाटील सर यांनी विज्ञानविषयक उपक्रमांचे महत्व स्पष्ट करत मनोगत व्यक्त केले. यानंतर संशोधक अद्वैत करकरे यांनी PPT च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध संशोधकांची माहिती, त्यांच्या संशोधनांची उदाहरणे, तसेच विज्ञानातील प्रयोग, प्रयोजन आणि नवकल्पना यांची ओळख करून दिली.

करकरे सरांनी विद्यार्थ्यांना अवांतर विज्ञानविषयक पुस्तके वाचण्याचे आवाहन केले. ‘एक होता कार्व्हर’, ‘अग्निपंख’ यांसारखी प्रेरणादायी पुस्तके वाचून संशोधनाची गोडी लावावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या मनातील विज्ञानविषयक विविध प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी त्यांच्या शंका निरसन केले.

🎖️ सत्कार क्षण



या कार्यक्रमासाठी मराठी विज्ञान परिषद, गडहिंग्लज येथील संदीप जोशी सर उपस्थित होते. शाळेतील सहाय्यक शिक्षक किरण चव्हाण सर यांनी कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले तर आभार  रणजित सुतार यांनी मानले.


📸 कार्यक्रमातील काही खास क्षण






🔍 विज्ञान म्हणजे उत्सुकता… आणि उत्सुकतेतूनच संशोधन फुलते!
आरदाळ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून प्रेरणा घेऊन विज्ञानाकडे नवीन दृष्टीकोनातून पाहण्याची सुरुवात केली आहे.

1 comment:

  1. चांगला उपक्रम आहे सर अभिनंदन🌹

    ReplyDelete