कवी अविनाश लोंढे यांचा प्रेरणादायी @75 उपक्रम; माध्यमिक विद्यालय आरदाळला कवितासंग्रह भेट
आरदाळ (ता. आजरा) :
माध्यमिक विद्यालय, आरदाळ येथे कवी अविनाश लोंढे यांच्या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक शरद पाटील यांनी पुष्प देऊन कवी अविनाश लोंढे यांचे स्वागत केले.
सहाय्यक शिक्षक किरण चव्हाण यांनी कवी अविनाश लोंढे यांचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. तसेच त्यांच्या “@75” या कवितासंग्रहाबद्दल माहिती सांगून त्यांचा साहित्यिक प्रवास, लेखनाची प्रेरणा आणि साहित्य क्षेत्रातील योगदान याबाबत विद्यार्थ्यांना माहिती करून दिली.
@75 प्रेरणादायी उपक्रम
आपल्या वडिलांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त समाजाला साहित्याची अनमोल भेट देण्याच्या उद्देशाने कवी अविनाश लोंढे यांनी @75 हा प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत त्यांनी 75 कवितांचा कवितासंग्रह प्रकाशित करून 75 शाळा व वाचनालयांना भेट देण्याचा संकल्प केला आहे.
📚 कवितासंग्रह भेट
माध्यमिक विद्यालय, आरदाळ येथे भेट देऊन शाळेला कवितासंग्रह भेट देण्यात आला.
📖 वाचनालय भेट
तरुण भारत वाचनालय, आरदाळ यांनाही कवितासंग्रह भेट देण्यात आला.
या उपक्रमामागे केवळ साहित्य प्रसाराचा उद्देश नसून आई-वडिलांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट, केलेला संघर्ष, दिलेल्या संस्कारांची जाणीव आणि त्यांच्या प्रेमाचा आदर आयुष्यभर जपावा, हा सुंदर संदेश विद्यार्थ्यांना मिळाला.
यावेळी कवी अविनाश लोंढे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वाचन, साहित्य आणि कवितेचे महत्त्व सांगितले. तसेच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित कविता विद्यार्थ्यांना वाचून दाखवली. विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात कवितेला उत्स्फूर्त दाद दिली.
मनःपूर्वक धन्यवाद !
शाळेच्या वतीने कवी अविनाश लोंढे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. तसेच त्यांच्या कवितासंग्रहास व पुढील साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
No comments:
Post a Comment