Thursday, June 26, 2025

माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

 


माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

                    दि. २६ जून २०२५ : माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापकानी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. यानंतर मुख्याध्यापक शरद पाटील यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या कार्याची माहिती दिली. यावेळी मान्यवरांचा  व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे सहायक शिक्षक यांचा  सुहास कोंडूसरक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच शाळेत नव्याने रुजू झालेले शिक्षक रणजित सुतार व स्वप्नाली बांबरे यांचाही शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर दहावी बोर्ड परीक्षेतील पहिले पाच विद्यार्थी निवेदिता सागर,अमृता कांबळे ,समिक्षा नरवडकर,दीक्षा राशिवडे व गणेश गुंडप तसेच एन.एम.एम.एस व सारथी परीक्षेत उज्वल यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन पारितोषिक वितरण करण्यात आले. मान्यवरांच्या मनोगतामध्ये शाळेचे माजी मुख्याध्यापक शंकर पावले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले , विजय डवरी यांनी विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून आपले करिअर घडवावे असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक साहित्यिक संजय खोचारे यांनी रंजक गोष्टी सांगून शाहू महाराजांच्या जीवनातील प्रसंग सांगत त्यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती करून दिली. तसेच अविनाश कुलकर्णी सरांनी शाहू महाराजांचे शिक्षणविषयक विचार सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव पन्हाळकर यांनी शाहू महाराजांचे विचार विद्यार्थ्यांसाठी मोलाचे असल्याचे सांगत गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिवाजीराव पन्हाळकर , प्रमुख मार्गदर्शक संजय खोचारे, अविनाश कुलकर्णी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक शंकर पावले, मुख्याध्यापक शरद पाटील,विजय डवरी, सचिन पावले,अमोल बांबरे उपस्थित होते तर पालक विजय नरवडकर, सुनील गेंगे, पांडुरंग कांबळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण लोहार यांनी केले तर आभार सुहास कोंडूसकर यांनी मानले.


No comments:

Post a Comment